Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ३५३

श्री. १७१२ चैत्र शुद्ध ३

रु.

पो छ १५ रजब तिसैन.

शेवेसीं श्रीराम सदासीव कृतानेक सां नमस्कार विज्ञापना छ १ रजब येथास्थित असो. विशेष. राजश्री सेनासाहेबसुभा याचें छ ४ जमादिलासरीं गंगेहून कूच होऊन छ ५ रोजी नकलपल्लीचे मुकामीं नागपूरची डाक आली भवानी नागनाथ मुनसीस फाल्गुन शु।। ३ देवाज्ञा जाल्याचें वर्तमान आलें. मुनशीविशीं सर्वास हळहळ वाटली. गुंडो शंकर कारकून पेशजी आडंपल्लीकडे पाठविला आहे. वेंकटराव गोड्याचे गांव तेलंग प्रांतीचे लुटितो. वस्ती होऊं देत नाहीं. गुंडो शंकर याणें त्यांजकडील एक ठाणें घेतलें, व लष्कर मार्गात जातां येतां रवेहून येक दोन घोडीं नेलीं, म्हणून सिरपुरचे मुकामींहून गुंडो शंकरास कुमक किसनसिंगास पाठविलें होतें. तेव्हां वेंकटराव गोड गुंडो शंकरास भेटला. छ १२ रोज चंद्रपुरास मुकाम आला. तेथे आठनव मुकाम जाले. हुताशनी करून चिमाबाई व वेंकाजी भोंसले राजेश्वरास गेले होते. ते छ २० रोजीं चंद्रपुरास आल्यावर, छ २१ रोजीं कूच करून, छ २५ रोज भृगुवार तिसरे प्रहरीं नागपुरास वाड्यांत दाखल जाले. देवघरापुढें दोन घडी बसले, रयत व कमावीसदार व राजाराम मुकुंद, बंगाल्याचे सुभे यांणीं वगैरे नजरा केल्या. चिमाबाई येतांच बाहेर शंकरदरियाजवळ खंडोजी भोंसले याजविशीं बहुत रडली. शहरांत येतांच वाड्यांत जावें ते गेले नाहींत. मागती बाळाबाई यांचे वाड्यांत जाऊन बसले. तेव्हां सर्वांणी जाऊन समजाऊन आणिलें. बाईस वारंवार दुःख बहुत आठवतें. मुनशीचें वर्तमान ऐकून खाशास मुछद्यांस सर्वांस वाईट वाटलें. हुताशनी चंद्रपुरावर केली. तेथें नाचरंग कांहीं केला नाहीं. याप्रों खंडोजी भोंसले याचे वाईट कोणासच वाटलें नाहीं. त्याचें स्मरण खाशास किंवा मुछद्यांस कोणासच होत नाहीं. असा बंदोबस्त येकच कट करून कृत्रिम करून अनर्थ केला. छ २७ रोज प्रातःकाळीं स्नान करून स्वारी मुनसीचे घरास गेली. त्याचे चिरजिवाचें समाधान करून, दोन घडी बसून, राजाराम मुकुंद, बंगाल्याचे सुभे यांचे घरास गेले. त्यांचे बंधूस बंगाल्यांत देवआज्ञा जाली. त्याची स्त्री सती गेली. राजाराम मुकुंद याचें समाधान करून आले. छ २८ रोज प्रातःकाळीं स्नान करून, प्रहर दिवसां स्वारी फुटल्या तळ्यास गेली. तळें पाहिलें. तेथें नवा बाग केला आहे, तो पाहिला. च्यार घडी निद्रा केली. बागांतील केळें आणून पठाण वगैरे लोकांस वाटलीं. साईकाळीं स्वारी आल्यावर स्नान करून, सोमवारचें भोजन केलें. छ २९ रोज प्रातःकाळीं स्नान करून, सवत्सरप्रतिपदेचें निशाण जरीपटक्याची पूजा केली. मुछदमंडळी वगैरे झाडून आले. देवप्रतिष्ठा जाली. श्रीरामनवमीचा उत्सव आहे. पूजाअर्ती जाल्यावर चार घडीं दरबार जाला. बंगाल्यांतील सावकार आला आहे. त्याणें हत्ती नग दोन नजर केले. येक मोठा व येक लाहाण आहे. महिपत दिनकर यास छत्तीसगडास जावयास मुहुर्तेकडून राहुटी बाहेर द्यावयास सांगितलें. आठाचौरोजांनीं जातील. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.