Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ३१७.

श्री ( नकल.) १७३७-३८.

यापूर्वी तहनामा शराकत व मवाफिकत तरफैनचा मुकरर व्हावा ऐसें जरनेल गोरनर लाटसाहेब बाहादर यांहांचे अंतःकर्णात होतें. परंतु राजेसाहेबांचे खातरेस बिलकुल मंजूर न पडला. याजकरितां बंदोबस्ताची तजवीज दुसरी कीं त्यांत फायदा तहनाम्याचा सरकार इंग्रज बाहादूरांचा मोहेसर होय हें लाजीम जालें. त्यास, नवाबवजीर महमदखान भोपाळवाले यांचे Khvashishi ख्वाहिसी दरखास्तीप्रमाणें लाटसाहेबांचे हुजुरांत या दिवसांत कबूल पडून खानमजकूर सरकार कुंपनीचे बसालती सिलसिल्यांत दाखल जाला आहे. त्यास, राजेसाहेबांनी महाराज दवलतराव शिंदे बाहादूर यांचे शरातीनें आपली फौज तैनात केली आहे कीं, मुलुक भुपाळचा आपले कबज्यांत अणावा. परंतु मुनासिब आहे जे, आपले सरदारांस या इराद्यापासून मना करावें. हा अर्थ लाटसाहेबाचे हुकुमाप्रमाणें श्रीमंत माहाराजांचे खिजमतेंत अर्ज करितों. व मुखलिसानें या दिवसांत लाटसाहेबबाहादुराकडून दोस्तीचे मरातीब दोनतीन वेळां राजेसाहेबांचे सरकारांत जाहीर करण्यांत आणिलें आहे. याजकरितां सांप्रत करणें जरूर न होतें की, नव्या शिरत्यानें पुन्हां बोलणियास मूळ दिसलें, परंतु लाट साहेबास अंदेशाची जागा आहे कीं, शायद गरजगो मनुष्याचे सांगण्यावर शुबाह व वसवास राजे साहेबांचे अंतःकर्णात प्राप्त होईल. या सबब तैशा मणुशाची जुबान बांधली जावी कीं, ते मानसें बिलकुल राजेसाहेबाचे सरकारचे खैरख्वा नाहींत, बलके लटकें बोलून विच्छितात कीं, सरकारचे कामाचे बेहबुदीत खलेल आदां न व्हावे, या सबब लाटसाहेबास मुनासब दिसलें कीं, मुखालिसांचे नांवानें या बेबारतीचा खासदस्तुरानें इनायतनामा लिहिला. त्यास त्या मजमुनाची अक्षरशा अर्ज करितों. लाट साहेब

बाहादुरानें तमाम बजिदगीनें लिहिले आहे कीं, राजेसाहेबांचे खिजमतींत अर्ज करावा तें इकडील चित्तांत. शिवाय दोस्ती राजेसाहेबांचे सरकारांत. दुसरा खियाल नाहीं व न जाला. व राजेसाहेबांचे मुमसानांचे खांदा इच्छित नाहीं. बलके, खातरा चित्तांत हमेशा आमचे ऐसे होते कीं, राजेसाहेबांची रियासत दुसरियाचे रियासतीनें निसबतीपेक्षां वावकर व सरसबाज व मजबूत राहावी. ज्या वेळेपासून राजेसाहेबाचे नारजावंदीचा सबब दर मोकदम करार पावणें सिलसिला शराकत मवाफिकत दोस्ती इंग्रेज बाहादुराचें सरकारासीं, तेव्हां आह्मांस उचित जालें जे नवी मसल्हत धुंडावी. आपसोस केली कीं, शायद या मसल्हतीनें राजेसाहेबांचे मर्जीस गिरानी येईल तर हकीम आहे कीं, निसबत सरकार मवासुफ फायेदा जाहीर होत आहे. याजकरितां यांस खातर राजेसाहेबांची मंजूर येऊन, या मसल्हतीची पैरवीस ढील टाकिली होती. परंतु सबब चंददरचंद मुसकिलीचें जालें आहे. प्रसंगास राजेसाहेबांनी आमचे चित्तांतील मरातीब मंजुर न फर्माविलें. तेव्हां आह्मांसही तैसेंच जालें कीं, बलके दोस्तीचे मुर्बीचे लवाजम्यानीं उचित व वाजवी होतें कीं, मजबुती व बंदोबस्त सरकारकुंपनीइंग्रेजबाहादुरांची आवघ्या गोष्टींवर अधिक जाणून, त्या रस्त्याची कोशीस ठेवावी. अस्तु. जे दोस्ती राजे साहेबांचे सरकारची आमचे सरकारास जैसी आहे तैसीच आहे. यापरता दुसरा खियाल समजूं नये. हरयेक प्रकारें आह्मीं इच्छितों जे, दोस्तीचे व स्नेहाचे सिलसिल्यांनी तमाम सरदार हिंद व दक्षणचे आपले कुदरतीचे हुकुमाप्रमाणें मजबूत असोन, बलकी दिवसों दिवस विशेशात्कार घडावा. याजकरितां हेंहि आहे जे, नजरसूद बेहबूद उमुराद सरकारइंग्रेजबाहादुरांचे जे जरूर पडेल त्यास ढील करितां येत नाहीं. व दरबाब मुकरर करणें शिरस्ते हिफाजत मुलूक सरकारइंग्रेजबाहादुरांचे प्राप्त जाले, त्यास महकूप करणें होऊं सकत नाहीं. याजकरितां जो नक्षा सदरीं लिहिला गेला यांतच फायदा लक्षांत आला. याविरहित लाटसाहेबांचे चित्तांत दुसरें आणीक कांहीं नाहीं. जेव्हां राजेसाहेब गौर फर्मावितील कीं, बायेसना किंवा ऐसें नारजावंदी ? रजावंदी आमचे दरबाब करार पावणें. नक्षा शराकत व हिफाजत दौहि दौलतीची कीं बहुतवेळां ख्यायेश आंग्रजाचे सरकारांतून जाली होती. करार पावणें या बंदोबस्ताची बहूत दिवसांपासून लाजिम होती. परंतु यांस खातर खुद्द व दौलतचे तहामुनवत व वकूफ राहिला होता. येकीन, जाणतील कीं लाटसाहेबांसी सिर्फ नाइकजीचे हे मसल्हत कबूल केली. तहकीक आहे जे, आंग्रेजीं जमियत भोपाळचे जिल्ह्यांत राहिल्यानें पेंढारी यांचे खारीज होणें या मुलखांतून व हिफाजत मुलूख राजेसाहेबांची बेखलश होईल व राजेसाहेबांचे सरकारांत बहुत फायेदा मालुम होत आहे. आंग्रेजांचे बाह्यात्कार राजेसाहेबांचा इरादा भोपाळचे मुलकावर होता, तो या नक्षामुळे हरकतीस पावला. त्यास, सरकार आंग्रेजांस या सबबाची लाचारी असे. त्यास राजेसाहेबांनी येकिन समजावें कीं, लाटसाहेब बेशक तरकीचे च्याहणार या रियासतीचे व दवलतीचे आहेत. बाकी, राजेसाहेबांस याचा तपसील दरयात्फ करावयाचा व जबाब देणें यांचें जें मंजूर असेल त्यासीं ज्या वेळेस हुकूम होईल त्या वेळेस हजर होईन व मुखलिसानें या मोकदम्याचा जबाब काय ल्याहावा हें उत्तर जलद व्हावें.