Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ३१४

श्री.

अजम फ्रान्सिस्क आंतोन दावीयोग काबराल गोवर्णदोर कपतान जनराल रुस्तुमुल्मुल्क सरफराजुद्दौले मुस्तकीम जंग बहादूर बंदर गोवा दाममोहोबतहूः--

शाहामत आवाली-मर्तबत व हशमत-मंजलत मवाकत दस्तगाहा–एतजादा दोस्तां आजज्यानीव दौलतराव शिंदे सलाम आंकी: येथील खैरखुषी जाणोन आपली खैरखुषी कलमी करीत जावी. दीगर: तुह्मीं पत्र पाठविलें तें मेजर फिलोस यांचे मार्फातीनें पालखी व किताब-मरातब वगैरै बादशाही वस्त्रांसुद्धां कृपा करून पाठविलें तें पावोन परम संतोष पावलों, म्हणोन लिहिलें तें कळलें, मेजर-मजकूर यांस किताबत करून पाठविली तीहि ध्यानास आली. खाजगत सरकारांत बंदुका-चकमकी, फिरंगी-विलायतीची दरकार आहे. यास्तव, तुमचे येथें विलायतेहून आल्या असतील त्या पाठविणें. हजार बंदुका, चांगली कीळकांटा-तोखतान–सुद्धां, तयार करवून, चौल-बंदर येथें पाठवून द्यावा. त्याची किंमत सर्व सरंजामासुद्धा होईल त्याचा आकार व चौलपर्यंतचा खर्च लिहून पाठवावा. त्याप्रमाणें ऐवज येथून मिंगेल खलीमसोज फिरंगी ममईकर याचें विद्यमानें पावता होईल. वरकड मजकूर मिंगेल-सोज लिहितील त्याजवरून कळेल.