Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १३३.
श्री.
पौ अधिक वा ४ शुक्रवार
१६९६ अधिक वैशाख शुद्ध ८
आशिर्वाद उपरी येथील क्षेम ता अधिक शुा ८ इंदुवासर मुा चिखलठाण वर्तमान यथास्थित असे. विशेष. बहुत दिवस पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी ऐसें नसावें. सदैव आपणाकडील कुशलार्थ लिहीत जाणें. विशेष. राजश्री नानांचें पत्र अमावास्येचें आले होतें. त्यांत लिहिलें होतें कीं, रावजी प्रतापगडास गेले, मातुश्रीस समाधान वाटत नाही, त्यावरून चिंता लागली आहे, त्यास, आरोग्य जाहलीयाचें वर्तमान लिहिलें पाहिजे. राजकी वर्तमान तरीः श्रीमंत फर्दापूरच्या घांटास गेले. आज घांट उतरले असतील, ब-हाणपुरच्या रोखें जातात. नबाबाकरितां दोन मुकाम हे फौजेचे येथें जाहाले. आज कूच जाहालें, मजलदरमजल त्यांचे पाठीवर जात आहेत. यांस त्यांस चाळीस कोसांची तफावत पडली आहे. पुढें काय होईल तें पहावें. प्रस्तुत मसलत लांबणीवर पडली, ऐसें दिसतें. ब्राह्मण मंडळी तर नित्य उठोन तिकडून येतच आहे. परंतु, मराठे मंडळींत अद्यापि कोणी येत नाही. मराठे फुटल्याविना ठीक पडतां दिसत नाहीं. सेनासाहेबसुभा यांचें वर्तमान तरीः नित्य उठोन धरणींपारणींच आहेत. सवा लक्ष देतात, त्याणें त्यांचे कांहीं होत नाहीं ऐसा प्रकार पडला आहे. राजश्री हरिपंत तात्या काल येथें आले होते. बोलणें चालणें जाहालें. परंतु, तात्पयार्थ, जिसे प्रों देऊं; अधिक मिळत नाहीं, यांस तरी तितक्यानें होत नाहीं. तात्यांचे कूच होऊन मजलीस जातात. यांचे कूच होणे कठीण पडतें. तेव्हां हिकडून तिकडून करून कूच करितात. कधी मध्यरात्रीस कधीं प्रहर रात्रीस मुक्कामास जातात ! याप्रमाणें प्रकार पडला आहे. परिणाम ईश्वर लावील, तरच लावूं. एरव्हीं ठीक दिसत नाहीं. विस्तारें काय लिहावें ! लोभ किज. हे आशिर्वाद.
राजश्री नाना स्वामीस सां नमस्कार विनंती उपरी. आपली रवानगी होणार, सत्वरच येतों म्हणोन लिहिलें, त्यावरून संतोष जाहाला. आपलें येणें होईल तरी उत्तम आहे. यादव वगैरे मराठे यांचे विचारें जातीनें कारभार करावा, ऐसें आहे. त्यामुळें हीं तिडणीं पडतात. पुढें काय होईल तें पहावें हे विनंती.