पत्रांक ५५३
श्री
१७२३ माघ वद्य ११
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री नारायण बाबूराव स्वामी गो यांसीः-
पो अमृतराव रघुनाथ नमस्कार विनंती उपरी येथील कुशल लिहीत जाणें. विशेष. राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा यांजकडे इकडील लाख रुपयांचे वरातेपैकीं तीस हजार रुपये राहिले आहेत. त्यास, सेनासाहेब सुभा यांचे कारभारी पुण्यास आले असेत. तरी, सदहू ऐवज राजश्री विठ्ठल बल्लाळ याचे हवालीं करणें. ऐवजास बहुत दिवस जाहले. येथें खर्चाची वोढ आहे. याजकरतां ऐवजाचा उलगडा लौकर पाडून देणें. जाणिजे. छ २४ शवाल सुा। इसने मयातैन व अल्लफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंती.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)