पत्रांक ५४९
श्री
१७२३ फाल्गुन वद्य ३
श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री ++ जी यांसी प्रति लक्ष्मीबाईचे अनेक आशीर्वाद उपरी येथील क्षेम तागायत फाल्गुन वा ३ रविवार पावेती कायगांवीं सुखरूप असों. विशेष. तुह्मी बयाजी सोनवणी याजबराबर पत्र पाठविलें तें पावलें. लिहिला मजकूर सविस्तर कळला. इकडील वर्तमान तरः कायगांवचे कौलास आज प्रारंभ केला. दुसरें, राजश्री धोंडोपंत गोडबोले तोफखान्याचे सुभा मालेगांवीं होते. त्यांशीं व शामतखां पठाण व गाबडे व अचबीसिंग वगैरे निा होळकर यांसीं लढाई जाली. धोंडोपंत यांनीं सिकस्त खाल्ली. याजकडील तोफा व पलटणी झाडून कापून काढिलें. जातीनिशीं घोंडोपंत आतेगाव वामळे येथें आहेत. समागमें हजारपांचशें लोक आहेत, असें ह्मणतात. परंतु सत्य मिथ्या न कळे. यांजकडील.पळ दीडशे राऊत काल शनवारीं कायगांवीं मुक्कामास होते. कांहीं उपद्रव जाला नाहीं. आज कूच करून पुढे गेले, धोंडोपंत पुढें होते. यामुळें पठाण वगैरे यांस कांहीं प्रतिबंध होता, तो मोकळा जाला. हाल्लीं चांदवडाकडे येण्याची आवई बोलतात. घाट चढल्यास ठीक नव्हे. मग श्री काय घडविणें ते घडवील. हाल्लीं बयाजी पाठविला आहे. तुह्मा समागमें माणूस अधिक असावें सा पाठविला आहे. बयाजीबरोबर साखर पाठविली आहे. पावेल. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)