पत्रांक ३७६
श्री तालीक
राजश्री हरीपंत तात्या गोसावी यांसीः-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रे।। महादजी शिंदे दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. रघुनाथसिंग चौधरी पो देवास याजकडे पोमा।चे चौधरातीचें कामकाज सुदामतपासून चालत आहे. याचे भाऊबंद हक्कदस्तूर हिंशाप्रमाणें घेत गेले. ऐसें असतां, कृष्णसिंग पेशजी पुण्यास येऊन आपले परी सरकारांत विनंति करून, हुजरे देवाशास आणोन दंगा केला. त्यावरी रा।। सदाशिव दिनकर लष्करांतून गेले. त्यांणीं हा मजकूर समजोन देवाशाहून हुजरे माघारे नेले. हें वर्तमान मा।रनिलेनीं सविस्तर सांगितलेंच असेल. रघुनाथसिंग यांचा काळ जाहाला. त्याचा पुत्र खुमानसिंग हालीं भोगवट्याप्रों वहिवाट करीतच आहे. कृष्णसिंग पुन्हां सरकारांत गैरवाका समजावितो म्हणोन हें किलें. त्यावरून आपणास लिहिलें आहे. तरी रघुनाथसिंगाची वहिवाट बहूत दिवस चालत आली आहे. त्याप्रमाणें चालवावी. कृष्णसिंग गैरवाका समजावील. त्यास ताकीद जाहाली पाहिजे. रा। छ २ रमजान, बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे, हे विनंति. मोर्तब असे. शिका.