पत्रांक ३७४
पु।। २
राजश्री नाना गोसावी यांसीः-
* साहेब किल्यांस आले तेव्हांही त्यास कांहीं सख्ती पोंहचली नाहीं, व आपणाकडूनहि पोंहचत नाहीं, याजवरून दोरी सईल पड़ली ? हे जात बेइमान. यांचा इश्वास धरूं नये. मागेंपासोन लबाड्या करीत आले. तें विदितच आहेत. त्याचे निसबतीचें माणूस आहे तें चाकरीचुकरी सांगितली तरी मानीत नाहीं. हें राजश्री सदाशिवपंत दादास निवेदन केलेंच आहे. आह्मी वारंवार आपणास लिहावें तरी ठीक दिसत नाहीं. सूचनार्थ लिहिलें आहे. कळेल त्याप्रों बंदोबस्त करावा. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ करीत असलें पाहिजे. हे विनंती.