पत्रांक. ३७३
श्री १७१४ अखेर.
विज्ञापना ऐसीजे. कलकत्याहून सात आठ पलटणें तेलंगी, त्याजमध्यें दाहा बारा गोरे कर्ते होते. त्यास सांगितले कीं, तुह्मी खुसंगीच्या मागे चेनापटणास जावें. तेव्हां ते निघून दोनचार मजली आले. मागाहून हुकूम आला जेः तिकडून न जावें. जलमार्गे जावें. तेव्हां गोरे होते त्यांनीं तेलंगे वेषधारी होते त्यांस सांगितलें, हुकूम याप्रमाणें आला आहे. तेव्हां हिंदू होते त्याणीं साफ सांगितलें की, याचा निभाव हिंदु धर्माचा जलमार्गे आच्यार होणार नाहीं. तेव्हां गोरे यांणीं कलकत्यास लिहून पाठविलें. त्याचें उत्तर आलें कीं हिंदु आहेत त्यांचें पारपत्य करणें. हें वर्तमान हिंदू लोकांस समजलें. तेव्हां एका करून गोरे वगैरे होते त्यांची त्यांचीच बनली. तेव्हां गोरे वगैरे माणूस पांचसातशें माणूस ठार झालें. कांहीं गोरे पळून कलकत्यास गेले. हिंदुमाणूस राहिलें तेंहि अफरातफरा जाहलें. गंजम शहर समुद्राचें तिरीं आहे तेथें एके दिवसी लाल मत्स्य मोठा निघाला. तें वर्तमान तेथें साहेब होता त्यास कळलें. त्याणीं किताबत काढून पाहिली. तेथें निघालें कीं आमके दिवशी समुद्राचें पाणी येऊन शहर बुडेल ! तेव्हां ताकीद करून शहर वोस केलें. कोणी राहिले त्यास पाणी येऊन शहर वाहून गेलें. म्हणोन वर्तमान समजलें. खरें लटकें देव जाणे ! हे विज्ञप्ति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)