पत्रांक ३७०
श्रीगणपती. १७२४ पौष शुद्ध १३
अजस्वारी राजश्री परशराम रामचंद्र ता। मोकदमानी, मौजे बोरगांव, प्रा। सिरालें सु।। सलाम तिसैन मया व अलफ.
राजश्री येशवंतराव जगजीवन नाडगौडा, पो मजकूर यांजकडे कर्जाऊ ऐवज येणें त्याचे रद कर्जास प्रों मकुरची नाडगौडीचा ऐवज लाऊन दिल्हा. त्याचें वसुलाचें काम राजश्री गोविंद रघुनाथ जोशी याजकडे सांगोन आलाहिदा सनद सादर जाहाली असतां, मौजे मजकूरचा हक्काइनामाचा वसूल सुरळीत देत नाहीं, ह्मणोन विदित जाहालें तर, सालाबादप्रमाणें हक्काचा व इनामाचा वसूल सुरळितपणें मशारनिल्हेकडे देणें. इनामाचा वाटेकरी यांस ताकीद करोन बाकी देवणें. फिरोन बोभाट येऊन देणें, जाणिजे. छ ११ जमादिलोवल.