पत्रांक ३६९
श्री. ( नकल ) १७१४ भाद्रपद वद्य ११
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री मोरोपंत स्वामीचे शेवेसीः-
पो बाळाजी जनार्दन सा नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिव दीक्षित ठकार वाजपेययाजी यांचे वर्षासन रु।। एक हजार पो खटाव येथील देशमुखीचे ऐवजावर आहे. त्यास, सालगुदस्तां सन इसन्ने तिसैनचे वर्षासनाचे रु।। दीक्षितांस पावावे, ते पावले नाहींत. म्हणोन कळलें. त्यास, तुम्ही पौ मजकूर येथील देशमुखीचे हक्कापौ एक हजार रु।। वसूल करून सालगुदस्तां सन इसन्ने तिसैनचे वर्षासनाचे सदरर्हू रु।। दीक्षितांस पावते करून, त्यांची पावती घेऊन पाठवावी. कदाचित् सालगुदस्ताचा ऐवज फडतरे यांणीं नेला असल्यास, सालमजकुरीं देशमुखीचे ऐवजीं निकडीनें वसूल करून, दीक्षितांस पावते करावे. रा। छ २४ मोहरम. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.