पत्रांक ३६६
श्री १७१३ पौष वद्य ११
दंडवत विनंति. आपण वेदमूर्त राजश्री नारायण भट बावा दीक्षित यांबरोबर आशीर्वादपत्र पाठविलें, तें पावोन समाधान जाहालें. पत्र लिहिले कीं, दो लग्नाचा उपाघेपणाचा विषये राहिला आहे, तो नारायणभट बावास देणें. ह्मणून लिहिलें, त्यावरून आह्मीं त्याचा फडशा केला. आपण रविसंक्रमणाचे तिल शर्करायुक्त पाठविले ते पावले. स्वीकार केला. वारंवार आशीर्वादपत्र पाठऊन परामृश करीत असावें. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ असों दिला पाहिजे. हे विनंति.
पौ। पौष वद्य ११, विरोधकृत,