पत्रांक ३६३
श्री. १७१३ श्रावण वद्य २
राजश्री तुकोजी होळकर गोसावी यांसीः-
छ सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो माधवराव नारायण प्रधान आशिर्वाद उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. राजे माणिकपाल संस्थान करोली मंडरावल यांजकडे सरकारचा सालाबंदी ऐवज येणें. त्यापैकीं बाकी बहुत राहिली आहे. त्यास, तुह्मीं फौज पाठवून, संस्थानिकास जरब देऊन, ऐवज बाकी सुद्धां महिपतराव कृष्ण व रा। रामचंद्र महादेव यांचे विद्यमानें वसुलांत येऊन, पुढील सरकारचे सालाबादी ऐवजास नेहमीं गांव लाऊन देवावा, याविशीं पेशजी तुह्मांस लिहिलें असतां, अद्याप बंदोबस्त यथास्थित जाहला नाहीं, ह्मणोन हुजूर विदित जालें, त्याजवरून हे पत्र लिहिलें असे. तरी तुह्मीं संस्थानमजकुरीं फौज पाठऊन, संस्थानिकास जरब देऊन, सालमजकूरपर्यंत मागील बाकीसुद्धा ऐवज मा।र निलेकडे वसूल होय तें करणें, व पुढें सरकारचे ऐवजास गांव नेहमीं लावऊन देवऊन, अमल सुरळित चाले तें करणें. जाणिजे. छ १४ जिल्हेज, सु।। इसन्ने तिसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद. मोर्तब असे.