पत्रांक ३५०
श्री १७१२
विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावलें. ढोकलसिंग याजवर खंडेराव हरी यांणीं जरब दिल्यामुळें निघोन गेले, त्यास बुंदले यांच्या सरकारचा भाऊपणा, यास्तव च्यार रु।। त्याजकडून करार करून घेऊन त्याची जागा पर्णे त्याजकडे ठेवावी, यांत भाऊपणाही राहून कार्य होईल, त्याचे कबिले वगैरेस उपसर्ग खंडेराव हरी याजकडून न लागे तें करावें, म्हणोन लिं। तें सविस्तर कळलें, येसीयासी, आपलीं पत्रें पूर्वी येविसीं आल्यावरून राजश्री खंडेराव हरी यासी लेहून पाठविलें होतें. त्यावरून मा।रनिलेनीं खोणीकडे मातबर पाठवून, त्यास घेऊन येऊन, सरजेतसिंग व ढोकलसिंग याचा कलह भाऊपणाचा होता त्याचा ठराव, दोन हिसे ढोकलसिंग व एक हिसा सरजेतसिंग, या प्रों करून हिसेरसीद फौजखर्च दोघांकडून च्यार रु।। ठराऊन घ्यावे, असें ठरविलें आहे. ढोकलसिंग याचे कबिले वगैरेस उपसर्ग खंडेराव हरी याजकडून लागणार नाहीं. येथून लिहिण्यांत आलें आहे.