पत्रांक ३३९
श्रीगणपती १७११ फाल्गुन शुद्ध १०
राजश्री गोविंद रघुनाथ जोशी स्वामी गोसावी यासीः-
सेवक परशराम रामचंद्र नमस्कार विनंती उपरी, रा। शामजी विठ्ठल कुलकर्णी मौजे चिकुर्डे, का। कोडोली, याणीं विदित केलें कीं, आमचा व आमचे पुतणे बापूजीवाजी याचा वाट गिविसी पेशजी कजिया होता. त्याचा निवाडा वालव्याचें थलीं होऊन परस्परें समजपत्रें व निवाडपत्र जालें आहे. त्याप्रमाणें बापू जिवाजी आमचा फडशा करीत नाहीत. येविशीं ताकीद जाली पाहिजे. ह्मणोन, त्याजवरून, हें पत्र लि।। असे. तर, तुह्मीं येविसीचें मनास आणोन, निवाडपत्राप्रों वाजवी फडशा बापू जिवाजी करीत नसल्यास निक्षूण ताकीद करून निकाल करवणें. तेथे न ऐकत, तर हुजूर पाठवून देणें. जाणिजे. छ ९ जमादिलाखर, सु।। तिसैन मया व अलफ. हे विनंती. *