पत्रांक ३३६
श्री १७११ माघ शुद्ध ११
सा।. नमस्कार विज्ञापना ता।.
प्रातःकाळ पावेतों स्वामींचे कृपावलोकनेंकरून वर्तमान यथास्थित असे. विशेष. राजश्री अलिबहादरबाबाकडून सरकारच्या लखोट्याची थैली एक आली. येतांच डाकेबराबर सेवेसी रवानगी केली असे. थैली पावल्यानंतरी सरकारचे लखोटे जे असतील ते सबनीस हुजूर प्रविष्ट करतील. इस्मालवेग पळोन जैपुरास गेला. तेथें राज्यांनी घरास येऊन, बहुता प्रकारें खातरजमा करून, येक हाती व तरवार व +++ घेऊन सन्मान केला. याप्रों जैपूरचे पत्रें आलीं त्यावरून सेवेसी विनंति लिहिली असे. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.