पत्रांक ३३५
श्रीगजानन १७११ माघ शुद्ध ११
रु
श्रीमंत राजश्री नानासाहेब स्वामीचे सेवेसी-
विनंति सेवक विश्वासराव आपाजी दि।। देवराव महादेव, कृतानेक सा। नमस्कार, विज्ञापना येथील वर्तमान ता। छ १२ * माहे माघ शु।। ११ पावेतों स्वामीचें कृपेंकरून शेवकाचे येथास्थित असे विशेष, छ २४ रबिलासरचे पत्र नवाब अकबर अल्लीखान याचें दिल्लीहून आलीं. त्यांतील घरु मा।र लि. हिला होता तो कांहीं समजल्यांत आला नाहीं. परंतु राजश्री पाटील बावांचें लस्करचें वर्तमान कीं इकडून सरकारची पत्रें व श्रीमंत स्वामीची पत्रें गेलीं त्याजवरून त्रिवर्ग सरदारांसी परस्परें रसायेण होऊन सुभेदार पाटीलबावांचे येथें मेजवानीस गेले होते, परंतु हिमत बहादर याजबा। मनांत शुधता नाहीं. बाह्य मात्र रक्षितात. जैपुरवाले राजे यांचे वकील राजश्री सुभेदार यांचे लस्करांत आहेत. याचे मार्फतीनें सलुखाचा पैगाम लागला आहे. मिर्जा इसमायलबेग खांकानोडचे प्रांतांतच आहे. दोन्हीकडे सूत्र रक्षन आहे. जेपूरवाले यांणीं लाख रुपये खर्चास पो आहेत. परंतु बशर्थ मा।रनिलेचीं कुटुंबें शहरांत दाखल व्हावी, तेव्हां ऐवज सावकारानें द्यावा, ऐसा करार आहे. त्याजवरून राज्याचा पाटील बावांचा तह ठरणार तेव्हां कुटुंबें तेथें पो ठीक नाहीं. यास्तव तेथें वमयकुटुंबसुधां तेथेंच आहेत. तह जाल्यानंतरी पुढें काय ठरेल तें पाहावें. यानंतरी छ ४ तारखेस हैदराबादेहून रो। गणपतराव वकील याचा जासूद यामार्गे गेला. त्याणें जबानी वर्तमान सांगितलें कीं नबाब स्वारीस शहराबाहेर निघाले होते. ते समई कोठून पत्र आलें नाहीं, परंतु, हतीवर स्वार नवाब होते, त्यास लाखोटा आपले हातें फोडून पाहिला, आणि आपले जेबांत ठेविला. मग मशरूनमुलुक यांजकडे क्रोधानें अवलोकन केलें, आणि स्वारी ते क्षणीं शहरांत दाखल जाली, उपरांतीक बंदोबस्त खासपागास व फौजेस ताकीद जाली कीं, जमा व्हावें. येसी आज्ञा होऊन डेरे बारादारीवर जाले आहेत. जासूद संक्रांतीस तेथून निघाला. मग डेरेदाखल कधीं जाले असेल तें न कळे. रुख कोणीकडे जावयाचा, हें समजलें नाहीं. हैदरखानाकडील ही वकील तेथून बारा कोसावर आला होता. कांहीं टिक्याचा सरंजाम बराबर आहे. दोन हाती, कांहीं जवाहीर, घोडे वगैरे आणिलें आहे. कांहीं फौज कुमकेस फिरंग्याकडे रवाना करावयास मागणार, ह्मणून ऐकिलें, वरकड, येथील वर्तमान तरी दोहों दिवसांआड शहाजादे स्वारीस निघतात. बागांत सहल चार घटका करून हवेलीदाखल होतात. समागमें रो बळवंतरावजी वगैरे मंडळी जात असते. नबाब अकबरअलीखान स्वामीचा स्तव बहुत करीत असतात की, श्रम बहुत जाला होता, परंतु आमचा गौर ऐसा केला कीं, खुशवक्ती त्याची कोठवर सांगावी, व बंदोबस्तही खातरखा आमचे स्वामी करितील ह्मणून नित्यशाह बोलण्यांत येतें. सेवेसी श्रुत व्हावें. आढळलें वर्तमान तें सेवकानें लिहिलें आहे. पत्राचे उत्तरीं सनाथ करणार स्वामी समर्थ आहेत. बहुत काय लिहिणें? लोभ केला पो. हे विज्ञापना.