पत्रांक ३२०
श्री. १७४२
हककित जंजीरे मुंबईन्युसपीपर छापून आलें. त्यांतील हासील मजकूर, सन १८२१ इसवी या सालांत दक्षणेंत कोणीही शककर्ता उत्पन्न होईल. तो सन ३० पर्यंत गुत्प राहील. सन १८३१ चे सालापासून किंचित् प्रगट होत जाईल. तो सन १८३३ पासून प्रकट होऊन राज्य करूं लागेल. हिंदुस्तानप्रांतीं चांभार यांचे जातींत एक शककर्ता पैदा होईल. तो हिंदुस्तानचें राज्य सात दिवस करील. त्याचा पराभव सन १८२१ चे सालीं शक करिता दक्षिणेंत जाहला आहे, तो चांभार याचे जातींत जाहला आहे, त्याचें पारिपत्य करून वलयांकित पृथ्वीचें राज्य यथान्यायानें करून करील, त्यास मंत्री तिघे होतील. त्यांची नांवें, दुर्जितसिंग व हिराशेट पारसी व फकीर महंमद ऐसे मिळोन, इंग्रजास कैद करून, राज्यकारभार चालवितील. हिराशेट पारसी शककरिता याजजवळ जाऊन, रदबदली करून, इंग्रजास मुक्त बंदनांतून करील. सन ३३ सांपासून कुंपिणी सरकारचा अंमल चालणार नाहीं. सन ३७ चे सालीं ज्यलमार्गी च्याळीस हजार फौज माहीम जिल्हे मुंबईस येऊन मातबर लढाई करून, मुंबई ठाणें घेऊन, गाढवाचा नांगर फिरवितील ! तेथील अंमल शककरिता याचे स्वाधीन करून मुंबई घेईल. तो चाकर होऊन राहील. पुढें चाळीसांचे सालीं दुष्काल पडेल. हें वर्तमान लिहिलें कशावरून ह्मणाल तर, रूमचे पाछाय यांजवळ कोणी रमलवाला आहे. त्यांणीं भविष्य पूर्वी लिहित गेला तें खरें होत आहे. हालीं त्याणे लिहिल्यावरून छापिलें आहे. श्रीनारायण प्रा।.