पत्रांक ३१९
श्रीलक्ष्मीकांत. ७३८ ज्येष्ठ वद्य ७
राजश्री नारायणराव वैद्य गोसावी यांसीं:-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो रघोजी भोसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीयें कुशल लिहित जावें, राजश्री सुभेदार-नाईक-निंबाळकर हे सरकारचे पदरीं आहेत व यांचा अगत्यवाद ज्यापक्षीं येथें आहेत त्यापक्षीं तुम्हांसहि जरूरच आहे. त्यास, यांचे चुलते राजश्री आपाजी नाईक निंबाळकर हे राजश्री पंतसचीव यांचे खटल्यामुळें तेथें अटकेत आहेत. व येविशीं पेशजी तुम्हांस तपसीलवार लिहिण्यांत * आलेच.
पो छ २० रजब जेष्ठमास.