पत्रांक ३१५
श्री लक्ष्मीकांत १७३६ वैशाख शुद्ध १५
पु।। राजश्री नारायणराव वैद्य गोसावी यांसीः-
दंडवत विनंती उपरी. कारभारी इकडील विसीं फारच कळमळ ठेऊन आहेत. त्यास, त्यांचा येथून संतोष करावा, हें मनांत आहे. त्यास, ही दौलत त्यांणीं आपली मोजावी आणि ज्यावेळेस जसा त्याचा इशारा येत जाईल त्याच रीतीनें येथूनहि करण्यांत येईल, हेंच पाहणें येथील आहे. यांत गुंता नाहीं, ही खातरजमा त्यांणीं आपली पक्की ठेऊन, जितकें उचित व चांगले तितकें या दौलतीविसीं जातीनें पाहत जावें. येविसींचे मजकुराची आज्ञा राजश्री नारायण यशवंत यांसीं केली आहे. ते तुह्मांस लिहितील, त्याजवरून कळेल. रा। छ ४ माहे जमादिलावल. हे विनंती. मोर्तब सुद.
पो छ १३ जा।वल, सन अर्षा अशर, शके १७३६ वैशाखमास. मु।। पुणें.