पत्रांक २९३.
श्री. १७०९ चैत्र शुद्ध ५.
मुरलीधर जोतिषी पातषाही यांचे पत्राचा तरजुमाः-
विशेष. फार दिवस कृपापत्र आलें नाहीं. तरी पाठविलें पाहिजे. आह्मी आपले शुभचिंतक जोतिषी आहों. पूर्वी कितेक पत्रें आपणांस पाठविलीं होतीं. हालीं कांहीं विचार शास्त्राज्ञेवरून लिहितों, तो ध्यानांत आणावा. आपले ग्रह बहत चांगले आहेत. तेणेंकरून शरीरीं आरोग्य राहावें, प्रतिष्ठा वाढावी. ईश्वराची कृपा व्हावी. लहान थोर सरदार हुकमीं अनुकूल राहावे. शत्रूचा नाश व्हावा. स्वपरदेशांत विख्यात कीर्तिवृद्धि व्हावी. थोर थोर राजे याणीं आज्ञा मानावी. अनेक नजरा येतील. पेशकशी येतील. स्वामींच्या रूबरू मान वाढावा, दुष्ट, चाहाड, लबाड यांचा नाश होईल. आपल्या फौजांस यश प्राप्त होईल. हैदर-नाइकाचे पुत्रावर हें वर्ष फार वाईट आलें आहे. शनिश्चर मकर राशीचा आहे. कर्नाटक देशाचे राज्यास मारील. पूर्वीही आह्मीं आपल्यास लिहिले होतें तें वर्ष हेंच आलें आहे. त्याचा मुलूकही श्रीमंताचे हातास येतो, घोडे, हत्ती, माल, तोफखाना येईल. च्यारी तर्फेचे फौजेवर श्रीमंताची फौज यशस्वी होईल. राज्यांत आपला अधिकार वाढत जाईल. दोन सरदार आपआपल्यात लढतील. आपल्यापासून सलूख होईल. शरणांगत येतील. राजा आपले इच्छेचें फळ पावेल. पौष-शुद्ध-पौर्णिमेस ग्रस्तास्त-चंद्र-ग्रहण होईल. सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, राहु एका राशीस येतील. त्यांचेही ग्रहण होईल. यांचे फळ हेंच आहे कीं, ज्यालंधर आणि अटक-अयोध्या- X X X ता येथील स्वामी आपल्या ++++ करून मारले जातील; अथवा अक ++++ थोर यांजवर पडेल. राज्य श्रीमंतांचें ++ दक्षणेस ज्या त्या देशावर जागा जागा दाखल होईल. याप्रमाणें शास्त्राज्ञा आहे. फाल्गुन मासीं तेरा दिवसांचा पक्षही पडला आहे. तीन सरदार मारले जातील अथवा मृत्यूंनीं मरतलि-अयोध्येचा स्वामी, कर्नाटक देशचा स्वामी. अटकचा स्वामी. हा विचार शास्त्राचे आज्ञेवरून केला आहे. पुढें ईश्वर-इच्छा बलिष्ठ आहे. एक थोर सरदार शत्रुत्व करील. अंत:करणापासून बिघाड करील. परंतु कांहीं होणार नाहीं. यास्तव, एक-सहस्र चंडीपाठ करवावा, सहस्र कन्याभोजन करवावें. सकल अरिष्ट दूर होईल. आपले घरीं या वर्षात दिव्य संतान होईल अथवा गर्भ होईल. आषाढमासीं आमचे कन्येचा विवाह आहे. तरी कृपा करून साहित्य करावें. आम्ही निरंतर आपणांस लिहीत आहों कीं, श्रीमंतांचा प्रताप वाढेल, अस्त-उदय होय तों राज्य होईल, थोर थोर मुलूक हातांत लागेल. एक चाकर माहादजी शिंदे पाठील याणीं जाऊन अंमल दाखल सर्व केला. गड-किल्ले मुलूक घेतला. परंतु आम्हांस दक्षणा न पाठविली. हालीं कन्येचा विवाह आहे. मि।।
चैत्र- शुद्ध ५, संवत १८४३.