पत्रांक २८३
श्री १७०८ चैत्र शुद्ध ३
श्री बाळकृष्ण प्रभु चरणारविंदीं.
तुह्मीं विनंतीपत्र फाल्गुन वद्य चतुर्थ, मुकाम नजीक सुरापूर वाघनगीरा श्रीकृष्णाउत्तरतीर येथील पाठविलें, तें चैत्र शुद्ध द्वितीयेस पावलें. कित्तुरावर टिपूचा जमाव फौज व गाडदी मिळून पंचवीस हजार होती. ते राजश्री तुकोजी होळकर व गणेशपंत बेहेरे त्यापासून पंधरा कोसांवर जातांच ते निघोन धारवाडचे आश्रयास गेले ह्मणोन बातमी आली, वगैरे राजकी सविस्तर लिहिले तें श्रीचरणीं निवेदन जाहालें. तुमचीं पत्रें दोन तीन आलीं. त्यांची उत्तरें पाठविलीं तीं पावलीच असतील. रवाना चैत्र शुद्ध तृतीया.