पत्रांक २८०
श्री १७०७ भाद्रपद शुद्ध २
यादी राजश्री रघोजी भोसले सेनासाहेबसुभा व राजश्री मुधोजी भोसले सेनाधुरंदर यांजकडील करारमदाराची कलमें, सु।। सीत समानीन मया व अलफ.
घरचा अगर बाहेरील कसाही प्रसंग पडला तर सरकारचे लक्षाशिवाय दुसरें लक्ष धरणार नाहीं. येणें प्रों करार
तुह्मीं पुत्रसुद्धां सरकारचे लक्षांत असावें, दुसरें लक्ष धरूं नये. येणेंप्रों करार.
इंग्रजांचा बिघाड जाला तर शरीक सरकारचे. येणेंप्रों। करार.
पांच हजार रुपयांचे कापड बाळापूर व वासीमचें सरकारांत दरसाल द्यावें असा करार पेशजींचा आहे. त्याप्रों, सालमजकूर सन सीत समानीनापासून सरकारांत दरसाल पावतें करीत जावें. येणेंप्रों करार.
प्रांत गंगथडी येथील महाल सरकारांत आले आहेत. तेथील वासदाणा. तुमचा. तो तुह्मीं घेऊं नये. याचे ऐवजी प्रां। वरकड येथील सरदेशमुखीबाबतीचा ऐवज सवादोन असावे, लक्ष रु।। तुह्मांकडे दरसालचें येणें तें तुह्मांस माफ केलें. याप्रों करार
सनइसने सितैनींत जाला आहे. व त्या अलिकडे सन तिसा सितैनांत ब्रह्मेश्वराचे सालीं अकरा माहालचा घासदाणा घेऊन एकसा करार आहे. त्याचा फडशा पेस्तर सालीं करावा. येणेप्रों करार.
ब्रह्मेश्वराचे मुकामीं कैलासवासी जानोजी भोसले सेनासाहेबसुभा यांसीं करार जाले आहेत. त्याप्रों चालावें. येणेंप्रों करार.
छ ३० सवाल, सन सीत समानीन, भाद्रपद, मुकाम पुणें.