पत्रांक २६७
श्री.
१७०३ चैत्र
......................................................................................................................................................जाहाजें आलीं. त्याजवरील सरदार याचे जबानीवरून मालूम जाहलें. ......मुंतणें नामें भारी जमावानिशी उमदा सरदार जंगी सामान घेऊन मुतआकिब येत आहे. तो आलियावर इकडील इंग्रजांचें एक बंदर राहणार नाहीं. नूरमहमदखान व नरसिंगराव यांसी आपलेपासीं ठेऊन आनंदराव यांसीं कृष्णराव नारायण याजबराबर पाठवावें ह्मणोन मुफसल कलमीं केलें तें हर्कबहर्फ दिलनिषीन जालें. चुनाचे जनरल कूट चिनापट्टणाहून फुलचरी वरून गुडलूर अडचणीची जागा पाहून, तेथें जाऊन, आश्रियास आला व आं मेहरबान मार्गात मुखालिफास घाबरें करीत गुंडलुराजवळ त्याचे फौजेस माहासिरा देऊन राहिले. हे षकल नेक दुरुस्त जाली. त्यास हाच कावू वख्त मुखालिफाचे पायमल्लीचा आहे. आंसाहेबी खुषकींतून व फरासीस येणार व आला तो दरयांतून बंदर किनारियासीं. या बमोजिम निकड जाहलियावर मुखालिफांस खूब सजा पोंहचेल, ऐसें इंजानेवांचे दिलांत वाटतें. विलफैल, इकडील मजकूर तरः गाडर बोरघांटाखालें येऊन तीन चार (पल) टने घांटावर पाठविलीं. त्यांचे मुकाबल्यास मेहेरबान हरीपंत व होळकर आहेत. हा मजकूर पेशजीं कलमीं करण्यांत आलाच आहे. फिलहाल परशराम पंडित मिरजकर बारा हजार व सरंजाम सुद्धां घांटाखालें इंग्रजांचे पिछाडीस रसद बंद करून पिछाडी करून पायबंद द्यावयाकरितां पाठविले. इतकियांत खासा गाडर घांटावर सरंजामसुद्धां आला. दोन तीन पलटणें घांटाखालीं ठेविलीं आहेत. त्यास, पंडतमारनिले यांणी घेराघेरी करून घाबरें केलें आणि दोन हजार बैल व किराणा बाबेचे व उंटें व छकडे वगैरे सरंजाम भरोन रसद जात होती ते मारली. बैल वगैरे लुटून आणिले. हालीं घेराघेरी करून आहेत. गाडर घांटावर आला ते दिवशीं मेहेरबान हरीपंडत व तुकोजीराव होळकर ते तलाव्यास गेले होते. ते वख्तीं इंग्रेज अडचणीची जागा धरून मुकाम करून राहिला आहे. तेथून दोन तीन पलटणें कोस दीडकोस चालून आलीं. त्यांवर सरकारचे तोफा व गाडद व बाणांची मारगिरी होऊन लढाई खुब त-हेनें जाली. इंग्रजांची (पलटणें ) हटाऊन माघारीं घालाविलीं. ते लढाईंत इग्रेजांकडील दोन सरदारांपैकी तोफेचे गोळ्यानें........... व दुसरा बाणानें ठार जाहाले. व कां......पलटणांतील लोक ठार व जायाबंद जाहला. सरकारचे गाडदी वगैरे कांहीं लोक कामास आले व जखमी जाहाले. याबमोजिब लढाई जाली. इंग्रज पक्या अडचणींत घांटावर राहिला आहे. तेथून.......................................तो मयदानांत यावयाचा कस्त करीत नाही. त्याचे लष्करांत रसद घांटावरून व घांटाखालून पोंहचावयाची बंदी आहे. सबब गिरांनीं व बहुत फिकीरींत आहे. ( चिनेहून चाळीस जहाजें, पन्नास लक्षांचा माल भरून इंग्रजी जहाजे येत होतीं. त्यांची व फरांसीसांची लढाई जाहाली. इंग्रजी जाहाजें फरांसीसांनी सिकस्त केली. ) फरांसिस याची गलबल दर्यांत आहे. असें जासुदी.... .........
( याप्रमाणें फतेमारी जासुदी ) जहाज.........मुंबईस आलें त्याणें वर्तमान सांगितलें.........मुंबईंत गलबल आहे. अशी बातमी मुंबईच्या सरकारांत आली. दरींविला, इंग्रजी दाहा पलटणें हिंदुस्थानांतून... .........वांतील दिलांत आणून सिप्रीकाल्हरावर आलीं. ही खबर राव मेहेरबान माहादजीराव शिंदे यांस मालूम होतांच, अवल कांहीं फौज रवानगी त्यारुखें करून मुतआबिक आपणही मातवर फौज बयम तोफखाना व सरंजाम व सरकारचे सरदार वाळाजी गोविंद व शिवाजी विठल वगैरा मेफौज, येकूण तीस पसतीस हजार फौजेचा जमाव करून, इंग्रजी पलटणीचे मुकाबल्यास गेले आहेत व फजल पलटणांची तंबी होईल, तें जुहूरास येईल. गुजराथचे जिल्यांत ( हंगामा ) करण्याविशीं पेषजीं गणेशपंत बेहेरे वगैरे सरकारची फौज दाहा हजार रवाना केली. त्यांणींही इंग्रजाचे तालुकियांत शिरोन हंगामा सुरू केला आहे. खुलस मुखालिफांस, चहूकडोन ताण व घेराघेरी, आजीज होत ऐसी आमलांत आली. आजिबाद होईल ते नमूदास येईल. कृष्णराव नारायण यांची व फौजेची तयारी जाहाली आहे. लवकरच येऊन पावतील; ह्मणोन हैदरअलीखान यास नानांचे नांवें हिंदवी पत्र.