Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

पत्रांक २४५

श्री. (नकल) १७०१ मार्गशीर्ष शुद्ध १०.

राजश्री बाळाजीनाईकनाना भिडे गोसावी यासीं:-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो फत्तेसिंग गाइकवाड सेनाखासखेल समशेरबहादर दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणेन स्वकीये कुशल लिहित असावें. विशेष. तुह्मी मुजरत अजुरदार समागमें पत्रे पाठविलें तें पाऊन सविस्तर लेखनार्थ ध्यानास आला. आंगराजाकडील मजकूर विस्तारें लिहिला कीं, केलें काय. ऐशीयासी, येथें त्यांतील एकहि प्रकार नाहीं. त्यावर तेथें आपणास दरबारी सांगितलें असेल त्यागोष्टीचा शोध पुरतेपणें मनास आणून कोणाच्या कागदपत्रीं काय, तें साद्यंत ल्याहावें. मारनिले व त्याचे बंधू असे मार्गशीर्ष शुा ३ अलंकारयुक्त राजश्री केशवराव देशमूख समागमें वडनगरास पाठविले आहेत. वरकड तेथें कोणी लबाडी केली असेल, त्याचें ठिकाण लाऊन ल्याहावें. तुमचे विचारासिवाय कांहीं नाहीं, येविशींची खातरजमा बाळाठाकूर याणी केलीच असेल. परंतु इतक्या लबाड्या मधींच होतात ! त्याचा शोध व शिक्यानिस पत्रें व स्वदस्तुर चिठी याचा शोध मनास आणून लिा कीं, पुन्हां हें न घडे. त्याचें पारपत्यही घडल्या कोणी असें करणार नाहीं. मधीचे मधें असें घडल्या घरबूडच होणार. त्यापक्षीं हें ठिकाण लाऊन जरूर जरूर लिा. माझ्या गळ्याची शपथ असे. तर आपण हे गोष्टीची सुस्ती करूं नये. बहुत काय लिहिणें ? रा छ ९ माहे जिल्हेज. हे विनंति.
मार्गशीर्ष वद्य ५ सोमवार रा नारायणराव गोविंद यांजबराबर अस्सल.