Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

पत्रांक २१८.

श्री.
१७०१ श्रावण वद्य ५

श्रीमंत राजश्री तात्या स्वामींचे सेवेसीं:-

सेवक गोविंद गोपाळ साष्टांग नमस्कार विनंती येथील कुशल ता छ १९ माहे सामान पावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. श्रीमंत राजश्री सेनाखा. सखेल समशेरबहादर यांचे व राजश्री अंतोबा बावांचें परस्परें वैमनस्य जाल्याविशींचे सविस्तर पेशजी पत्रीं लिा आहे त्यावरून ध्यानांत आलेच असेल. अंतोबा बावांचें व यजमानांचें यथास्थित रीतीनें चालावें यास्तव आज दिवसपर्यंत दोहीं पक्षीं चांगलेच निभावलें. प्रस्तुतकाळी हे येथें आले. यजमान साहेबांनी त्यांस कित्तेक प्रकारें सांगितलें. आपणही त्यांस सांगावयाचे रीतीने सांगत गेलों. परंतु यांचें त्यांचें यथास्थित न राहतां वांकडें पडोन नासलें. हें सविस्तर यजमानांनीं आपणांस लिहिलें आहे. व राजश्री बाळाजी अनंत यांसी रा बाळाजी नाईक भिडे यांजकडे पाठविले आहेत. इकडील अर्थ नाईक आपणांसीं बोलतील, ते ध्यानात आणून बंदोबस्त यथास्थित करून द्यावा. सर्व प्रकारे भरंवसा आपला आहे. वरकड इकडील सविस्तर राजश्री बालाजीपंत आपणांस लिहितील त्याजवरून ध्यानास येईल. आह्मांस सर्व प्रकारें आधार स्वामीचा आहे. बहुत काय लिहिणे? कृपा लोभ करावा हे विनंती.