पत्रांक १६९
श्री.
अंदाजे १६९८
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री लक्ष्मणपंत बाबा स्वामीचे सेवेशीं:-
पो हरी बल्लाळ व पद्माकर बाबूराव सां नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित असलें पाहिजे. विशेष. राजश्री आबाजी खंडो सुदामे सालगुा श्रीमंत राजश्री दादासाहेब याजकडून निरोप घेऊन आपले घरास जात होते. त्यास खंडाळ्याचे ओढयावर चौरांनीं लुटलें. तेव्हा आपण वाईंत होते. खंडाळेकरांनी माग काढिला तो भुइंजेस आला. तेथे सा-या रामोशांनी मिळोन मनसोबा करोन, भुंइजे पुढें चिंधोळीस माग न्यावा. ते टाकून, खडकी येथें माग न जातां सा-यांनीं एकोपा करून, खडकीचा रामोसी चोर ह्मणोन धरिला. तो आज ता कैदेंत आहे. त्याची चौकसी पहातां त्याजकडे मुद्दापत्ता नाहीं. तेव्हां सा-या रामोशांनी दाव्यादंदाने धरिला किंवा कसा धरिला ते जाणत. सा-या रामोशांनी......( वि ) चारूं लागले कीं, हा तुमचा चोर. तेव्हां आबाजी खंडो आतुर. सारे रामोशी याणीं आणून विचारितात. त्यास ह्मणतात कीं, आह्मीं करू त्यांत तुह्मीं आहां, कीं तुमची चोरी आह्मीं उगऊन देतों, त्यावरोन आंबाजी खंडो यांणीं हा चोर ह्मटलें. त्याजवरोन खडकीकर रामोशी आणोन वाड्यांत ठेऊन गेले. चौकशी करितां, पांच सात गांवचे रामोशी वाईस आणून विचारलें की, “ खडकीकराकडे मुद्दा शाबीत करून देणें, नाहींतर सारे मिळोन चोरीचा फडशा करून देणें. तेव्हां मुद्दापत्ता नाहीं, सा सात गांवचे रामोशी यांनीं करार केला कीं, आबाजी खंडो याचें काय गेलें तें सत्य पुरस्कर सांगावें. सारेजण मिळोन हिस्सेरसी करोन, कागद लिहोन देऊन, आठ पंधरा दिवसांचा वाइदा करून गेले, नंतर खंडाळेकरास आणलें. त्यांनीं तीस रुा ठराऊन गेले. परनिशेचें खतच दिल्हें आहे. वेळेकर व कवठेकर व सुरूकर हेही कबूलच आहेत, मौजे बदेगांवकरांवर रोखा केला. त्यास, त्याणीं गैरवाका रा रामाजपिंत घाटगे यास समजाऊन, त्यांणी स्वामीचें पत्र आणिलें. पुढें रोखे ( पुढें फाटून गेलें आहे.)
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)