Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

पत्रांक १४३

पौ अधिक वद्य ४ शुक्रवार,
श्री. १६९६ अधिक वैशाख शुद्ध १३

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बाबूराव स्वामीचे सेवेसीः-

पोष्य जिवाजी माहादेव काणे कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत. जाणें. विशेष. आपणांकडील पत्रें बहुत लोकांस येतात. परंतु आमचें स्मरण होऊन पत्र येत नाहीं. याजवरून अपूर्व वाटलें. तुमचा आमचा स्नेह तैसा नाहीं जें विस्मरण पडावे. परंतु कालमहिमा आणि कारभारसंबंध याजमुळें विस्मरण जाहालें असेल! तरी ऐसें न करितां हरिघडी कृपापत्रीं संतोषवीत जावें. आमचें वर्तमान तागाईत छ १२ माहे सफर पावेतों सैन्यांत सुखरूप असों. स्मरण करून पत्र पाठवीत जावें. येथें लक्षुमणपंत आहेत, त्यांशीं बहुत स्नेह आहे. सर्व प्रकार तुह्मांकडील ल्याहावा. बहुत काय लिहिणें ? हे विनंती.