पत्रांक ११६.
श्री.
पौ चैत्र वद्य २ मंगळवार,
१६९६ चैत्र शुद्ध १४
आशीर्वाद उपरी येथील क्षेम ता चैत्र शुद्ध १४ रविवासर मुकाम नजीक नाझरें वर्तमान यथास्थित असें. विशेष. इकडील सविस्तर वृत्त राजश्री हरीपंत तात्यांच्या पत्रावरून कळेल. श्रीमंत राजश्री सेनासाहेबसुभा काल वीस कोस मजल करून आले. कारण जे मामाची गांठ पडावी. त्यास, मोमांनी उतावळी केली. यामुळें यश त्यास आलें. नबाबाकडे दोन तीन सांडणीस्वार रात्रौ पाठविले. त्यांनीं अकरा कोसांचें कूच करून ये फौजे शेजारीं येऊन आज उतरतील. सर्व सरदार एकत्र होऊन उदईक त्यांचे तोंडावर जातील. सर्व गोष्टी मनोदयानुरूपच घडतील. चिंता नाहीं. नबाबाची व आपले यजमानाची कायमता आहे. चिंता नाहीं, राजश्री हरीपंत तात्या वे सरदार सर्व येथें आले. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दिजे. हे आशीर्वाद.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)