पत्रांक ११३
श्री.
पौ छ ११ मोहरम.
१६९६ चैत्र शुा १२
आशिर्वाद उपरी. याचे फौजेंत पोटाचा गवगवा तीन लक्षपर्यंत दरमहा लागतात. त्यास, लक्ष रुानें काय होतें? हाल मामांनी सव्वालक्ष द्यावयाचा करार केला आहे. त्यांस निदानीं दोन तरी पाहिजेत. त्याविषयीं दोन तीन वेळ लिहिलें होतें. त्याचें उत्तर आलें कीं, दरमहा नेमावें, तेव्हां पन्नास हजार देऊं ह्मणतात. ह्मणोन लिहिलें. त्यास मसलत भारी. कराराप्रों विभागणी होईल, ह्मटल्यास कैसें होतें ? प्रसंगोपात्त खर्च केल्यास कैसें होईल ? आपण दरमाहा नेमावें ऐसा लाभ आपणास कोणता ? आपण चाकरी करावी तें करित असतों. दरमहा नेमावें ह्मणतात. तेव्हां अपूर्व आहे. एवढी सरदारी त्यांचें लक्षीं असतां आणि ते जबरदस्त असोन दरमाहानें मागतात, हें काय आहे ? त्यांनींच द्यावी, हें त्यांस उचित. दोन लक्ष रुपये दिल्यानें कांहीं बुडतात ऐसें नाहीं. आणि दिल्याखेरीज यांचे नीट पडणार नाहीं. याजकरितां एकदोन वेळ मर्जीनुरूप ह्मणोन पहावें. न देतील तरी उपाय काय ? हर कैसें तरी चालेल, परंतु वाईट दिसेल याजकरितां वरचेवर लिहितों. उत्तर निविष्ट पाठवावें. बहुत काय लिहिणे ? लोभ किजे. हे आशिर्वाद. कराराची यादी सरजामाची पाठविली आहे. त्यावरून कळेल. हे आशिर्वाद.
राजश्री नाना स्वामीस साष्टांग नमस्कार. विनंती. राजश्री तात्यांनी लिहिलें आहे त्यावरून कळेल. हे विनंती. मामाच्या भाषणेंकरून नबाब अजुर्दा व हेहि अजुर्दा ! हें ठीक नाहीं. आपण ह्मणतील कीं, मामा राज्यांत शहाणे त्यास हे खरें. परंतु सत्तेचें शहाणपण आहे ! प्रसंगोपात विचारणा दिसत नाहीं. हे दिवस जबरेचे नाहींत. समाधानानेंच करून सर्व गोष्टी नीट पडतील. त्यास, ती गोष्ट येथें नाहीं. कळावें, हे विनंती.