पत्रांक ९७
श्री.
पौ छ २ मोहरम.
१६९५ फाल्गुन वद्य ११
राजश्री नानाजी कृष्ण जोशी व बाबूराव विश्वनाथ वैद्य गोसावी यांसी:---
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो साबाजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. छ १७ जिल्हेजीं रुकनद्दौला व शर्फुदौला यांच्या भेटी जाहल्याचें वर्तमान लिा आहे. जावितजंग यासीं आणावयाबद्दल राजश्री दिवाकर पुरुषोत्तम यांस पा होतें. तेही काल छ २२ जिल्हेजीं दाखल जाहले. या उपरी कांहीं गुंता नाहीं. नेमलेल्या कामासच जावें. आणखी प्रकार नाहीं. वरकड राजश्री कृष्णराव व लक्ष्मणपंत यांणी लिहिलें आहे, त्याजवरोन कळों येईल. दोन चार पत्रीं राजश्री सखारामपंत व राजश्री बाळाजीपंत यांच्या पत्रीं मेजकुर कीं, स्वार पो खर्चास पाठऊं. त्यास, राजश्री त्रिंबकराव मामा यांची मर्जी आह्मांस दरकार. या मसलतीस मुख्य उपयोग. तिढण नसावी. त्याणीं पत्र लिहून मागितलें. तें आह्मी दिलें. त्याजवरोन कळलें असेल, त्यास, पोटाचा गवगवा लोकांस मोठा आहे. कामाची मुनासद बारीक आणि पैसा नाहीं, मामाकडेसच ऐवज आला नाहीं. हा मजकूर एक व प्रसंगीं एक असावें. ऐसें दोन मजकूर आहे. येविषयींचा सिद्धांत तेथें उभयतांचे विचारें काय तरतूद हे कळावें रवाना छ २४ माहे जिल्हेज. आह्माकडील सर्व अभिमान राजश्री बापूनीं व नानांनीं धरिला. तेथे अधिक लिहिणें ऐसें नाहीं. तुह्मी जवळ असा. बहुत काय लिहिणे? हे विनंती. मोर्तबसूद.
