पत्रांक ८१
श्री.
१६९४ माघ शुद्ध ८.
राजश्री संभाजी जाधवराव गोसावी यांसी:-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो नारायणराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहित जाणें. विशेष. तुमच्या लोकांनीं तुमासीं गवगवा केला आहे, ह्मणोन कळलें. तरी तुह्मीं लोकांसह वर्तमान हुजूर येणें. येथें लग्नाचा प्रकार आहे. तरी सत्वर येणें. जाणिजे. छ, ७ जिलकाद. वहुत काय लिहिणे ? लेखनसीमा.
