पत्रांक ५९.
श्री.
पौ छ ७ जिल्हेज चैत्र
१६९० फाल्गुन बहुले ३
तीर्थस्वरूप राजश्री दादा व तथा राजश्री बाजीपंत दादा वाडिलांचे सेवेसीः-
अपत्ये गणेशानें दोन्ही कर जोडून शिर साष्टांग नमस्कार विज्ञापना ता फाल्गुन बहुल त्रितीया, म।। ब्रह्मेश्वर गंगातीर, नजीक निर्मल, समस्त सुखरूप असों विशेष. आपली दोन्ही पत्रें एक सांडणी स्वारांबा व एक जासूदा बा ऐशीं दोन पत्रें पो तीं पावलीं. लि।। मजंकूर कळला. इंकडूनहि पेशजी सडी स्वारी जालया उपरी सांडणी स्वाराबराबर वे जासूदाबा ऐसीं व कले. झरा वरून ऐशीं तीन पत्रें पो तीं पावलींच असतील. किंवा न पावलीं हें कांहींच कळत नाहीं. तरी सविस्तर लि।। पाहिजे. यानंतर इकडील मजकूर तरीः चांदे याजकडे होतों ते समर्ई बातमी आली की, भोंसले पुण्यास चालिले, त्याजवरून राजश्री गोपाळ रावजी व रामचंद्र गणेश व शाबाची भासले वगैरे पथकें ऐसीं सडी करून पाठीवरीरखाना केलीं. तें माहुराहून दरमजल वीस वीस कोस मजली करून खंदारानजीक भालकीचे मैदानांत भोंसले यांची आमची विसा कोसांची ( तफावत राहिली ). एक मजलीचें अंतर राहिलें. तदनंतर भालकीवरून पुणियाकडील वोढ सोडून, बैदरावरून भवानगर उजवें टाकून, संगारडमिंगोरडी पेठेवरून दररोज पांच गांवें सा गांवे येणेंप्रो, तो पुढें, आमच्या फौजा पाठीमागें, ऐशा झाडींतून पंधरा वीस रोज याप्रों चालिलों. त्याणें फारच गणिमाई केली ! तीन च्यार रोज भाकरी नाहीं. बकरीयाजवरीच जीव धरून फारच निकड करून निघोन गेले. अखेर गांठ न पडली. महिनाभर पर्यंत आमचे फौजेस पांच गांवें सा गांवें दौड पडली. शेवटीं मंथनकालेश्वराजवळ गंगा उतरलों. भोंसले तसेच पुढें झाडींतून चांदे याजकडे गेले. पुढें मागें जावे तरी, मुलुख त्यांचा, झाडी फार, याजकरितां गंगातीरानेच मुकाम मजकुरीं श्रीमंतांस येऊन मिळालो. सहा दिवस जाहले. घोडियांत व माणसांत कांहीं बाकी राहिली नाहीं. फौज अगदीं सडून गेली, दोन अडीच हजार पावेतों घोडे राहिले. झाडींत पांच सहा लंघनें घोडियांस जालीं. याजप्रों स्वारी जाली. या मागेंहि येणेंप्रमाणें स्वारी जाली नाहीं व पुढेंहि होणें नाहीं. कळलें पाहिजे. येथें श्रीमंतांचे मुकाम दाहा बारा जाले. सल्ला मामला होत आहे. बोली चाली आहे. पुढें काय मजकूर होईल तो सेवेसीं मागाहून लिहून पाठवून देऊं. सारांश, आपणाकडील सविस्तर मजकूर लिहून पाठवावे. वेदशास्त्र संपन्न रा जगन्नाथ देव बाबा व राजश्री मथुनाथ देव बाबा स्वामीस सिरसाष्टांग नमस्कार लिा परिसोन आपण माघ मासाचें आशिर्वाद पत्र पों तें या मुकामीं पावलें. दर्शनतुल्य संतोष जाहला. सदैव आशीर्वादपत्र पाठविलें पा. लोभ असे दिजे. हे विज्ञप्ति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)