Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

पत्रांक ५८

श्री.
१६९० फाल्गुन शुद्ध ४

वेदमूर्ती राजश्री गणेशभट हरडीकर स्वामीचे सेवेसीः-

विद्यार्थी विठ्ठल कृष्ण साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय ता फाल्गुन शुद्ध ४ रविवार जाणून स्वकीय लिहित गेलें पाहिजे. विशेष तुह्मांकडून सांप्रत पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. देवालयाचें काम सिद्धिस गेलें कीं नाहीं ? घराचें काम कोठवर आलें ? काय करितां हें कांहींच कळत नाहीं. तरी सविस्तर लेहून पाठवणें. घराचे कामाचा बखेडा फार न वाढवणें. सत्वर काम करून घेऊन, राजश्री शंकराजी केशव यांसी पुण्यास पाठवून द्यावयाविशीं तुह्मांस पेशजीं लिहिलेंच आहे. त्याप्रमाणें घराचें काम सत्वर उरकून घेऊन शंकराजी केशव यांसी पाठवून देणें. सारांश, खर्च वावगा न करणें. काम सत्वर आटोपून घेणें, चिरंजीव केशो उद्धव, विसा उद्धव यांचें वर्तमान काय तें लेहून पाठविणें, पुणियांत भोसले येतात म्हणून भारी गडबड जाली होती. पुणें पळालें होतें. आमचींही बायकामुलें पुरंधरीं गेलीं आहेत. पांचा साताराजांनीं आणविणार आहें. कळावें. अद्याप भोंसलिया कडील कजिया तुटलासा जाला नाहीं. लांबला आहे. पुढें किती दिवस लागतील पाहावें. सारांश, तुह्मीं श्रीचें व देवीच्या देवालयांतील काम सांगितलें होतें त्याप्रा, झाडून करणें, घराचें काम मध्यम रीतीचे लौकर करून घेणें. फार थोर कराल, काम वाढवाल [ तरी] पैसा मिळणार नाहीं. जें काम कराल तें चांगलें करणें. आपले कडील सविस्तर वर्तमान लि।। पाहिजे. बहुत काय लिहिजे ? कृपा करावी, हे विनंति. इ. इ.