पत्रांक ५१.
श्रीलक्ष्मीकांत.
१६९० श्रावण शुद्ध ७
राजश्री माधवराव पंडित प्रधान गोसावी यांसीः-
सकल गुणालंकरण अखंडित लक्ष्मीआलंकृत राजमान्य स्नो जानोजी भोंसले सेनासाहेब-सुभा दंडवत विनंति येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असलें पाहिजे. विशेष, गोसावी यांनीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाहला. राणोजी करांडे याचा करार राजश्री दादासाहेब यांसी केला आहे कीं, पूर्ववत् प्रों त्याचा सरंजाम देऊन, मारनिलेस पदरीं बाळगून, पहिल्याप्रों सेवा घ्यावी ह्मणोन. त्यास हालीं मारनिलेस फक्त कांहीं न देतां दिल्हा ह्मणोन विदित जाहलें. त्याजवरून हे पत्र लिहिलें आहे. तरी कराराप्रमाणें त्याचा सरंजाम देऊन त्याची रसीद केशो शामजी व खिजमतगार पाठविले आहेत, त्याज समागमें पाठवावी, ह्मणोन लिहिलें. ऐसियास, करांडे मजकूरास सोडिलें ते समयीं त्याणें करार केला कीं, आपण नरनाळा ग्वालीं करून देतों, गोंडवानचा सरंजाम किल्ले जातीचा नलगे, वराडांत सरंजाम आहे त्यापैकी जो कृपा करून देतील तो घेऊन एकनिष्ठेनें चाकरी करून दाखऊन उर्जित करून घेईन. याप्रमाणें करार करून, शपथेचें पत्र लिहून सरकारचे ऐवजाचे भरण्याबद्दल निरोप घेऊन, त्याजनंतर महिनाभर पर्यंत सेवेसीं येतों, बेईमानी कदापि करणारं नाहीं, ऐसें लिहित आला. त्याज अलिकडे तो सर्व प्रकार टाकून मनस्वीपणाची वर्तणूक मांडली आहे. वराडांत रोखे करावे, स्वा-या कराव्या, सरदार मा. रावे, मुलूख खराव करावी, हा विचार मांडला आहे. यास्तव त्यासच निक्षुन आज्ञा होऊन यथास्थित रीतीनें वर्ते,आणि येथें येऊन कराराप्रोंच चाले असे जालिया येथूनहि अंतर होणार नाहीं. एतद्विशई अर्थ सर्वज्ञतेचे ठाई विस्तारें ल्याहावेंसें नाहीं. रा छ ६ माहे रबिलाखर, सुज्ञाप्रति विशेष काय लिहिणे ? कृपालोभ असूं दिला पाहिजे. हे विनंति. मोर्तबसूद
