पत्रांक ४६.
श्री.
१६९० चैत्र शुद्ध ११
( नकल बमोजिब अस्सल. )
अज सरकार राजश्री गंगाधर यशवंत, दिम्त राजश्री तुकोजी, होळकर सुभेदार, ता तुळाजी पाटील मोकदम मौजे हस्त पोखरी, परगणे आंबड सुा समान सितैन मया व अलफ. राजश्री सटवाजी गायकवाड व वासुदेव संभाजी यांच्या अमलांत सन ११७३ मध्यें ज्याहानखान्यांत व मोसम कलाल वगैरे का मजकूर यांची चोरी झाली. त्याचा ऐवज नगदी-यांत तहकीक करून सटवाजी गायकवाड यांचे विद्यमानें सरकारांत घेतला. तुह्मांकडे कलाल मजकूर याचा कझ्या राहिला नाहीं. तुह्मीं मौजे मजकुरीं आपली खासर जमा राखून, मौजे मजकूरचे कीर्द आबादी करून, सुखरूप राहणें. कलाल मजकूर कोणेविशीं कथळा करील तर त्यास सरकारांतून ताकीद केली जाईल. जाणिजे. छ, ९ जिल्काद.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)