Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[१७८] ।। श्री ।। २ मे १७६०.
पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसि-
विनंति उपरि तुह्मीं अबदालीच्या लष्करांतून बातमी२६७ यावयाची तजवीज केली. तें फार उत्तम केलें. या उपरि तिकडील बातमी रोजचेरोज कच्ची लिहून यावी. त्यास येथें आलियावरी पैका काय मिळाला ? व बराबर खर्च त्याचा किती आहे ? खासा फौज त्याचे देशची किती ? कोण कोण सरदार ? किती जुमलेदार ? नजीबखान व रोहिले वरकड किती ? पायाचे माणूस किती ? तोफा किती ? कशा आहेत ? सेर जाहले, बुणगे लाविले, ते कोठें गेले ? याची काय तजवीज आहे ? मुलकांत अम्मल कोणत्या जागा कसा आहे ? हें कुल वर्तमान बारीक बारीक कळावें असें जरूर करणें. सेट्याजी खराडे याचे पुत्र व आनंदरावराम याची खबर आहे कीं जिवंत सांपडले आहेत. त्यास तुह्मीं त्याचा शोध तेथें करवून हे कोठें आहेत ? कसे आहेत ? तेंहि बातमी कळे असें करणें. जाणिजे. छ १५ रमजान. बहुत काय लिहिणें. हे विनंति.