Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[२३०] ।। श्री ।। १६ आगष्ट १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविद बल्लाळ स्वामी गोसावी यांसि:
पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. ऐवजाकरितां तुह्मांस वारंवार लिहीत असतां अद्यापि ऐवज येत नाहीं हे कोण गोष्ट ? प्रस्तुत सर्व अर्थ राजश्री गंगाधर मल्हार यांस आज्ञा करणें ती केली आहे. हे लिहितील त्याप्रमाणें सत्वर ऐवजाची तरतूद करून पाठविणें. दिरंग न लावणें, वारंवार लिहित गेलों. दहा लाखापर्यंत बाकी व पंधरा लाखापर्यंत रसद एकूण पंचवीस लाखापर्यंत जलदीनें येत तें करणें. तिकडील वर्तमान लिहिणें. जाणिजे. छ ४ मोहरम सु। इहिदे सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें. हे विनंति.