[४६] ।। श्री ।। ५ फेब्रुवारी १७५५
राजमान्य राजश्री बाबूराव महादेव दि॥गोपाळराव गणेश गोसावी यांसिः-
सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार सु॥ खमसखमसैन मया व अलफ. वे॥ राजश्री नारायणभट सात्विक व गंगारामभट सफरे व गुंडभट यांणीं विदित केलें कीं आपण त्रिवर्गांहीं गणेशदास प्रयागदास याचे दुकानची हुंडी नव हजाराची श्रीक्षेत्रीहून महू कूपा येथील केली होती. त्यास, सावकाराचे दिवाळे निघालें. याजमुळें आपले रुपये फसले. त्यास, सावकाराचा कांहीं देवघेव अजमगडचे राजाकडे वगैरे जागाजागा आहे व हालीं दुकान श्रीक्षेत्रीं आहे. त्यास, तें अवघें जप्त करून आमचे रुपये वसुलात येतें करावें ह्मणून. त्याजवरून तुह्मांस लिहिले असे. तरी तुह्मीं सुजाअतदौले याजपासून अजमगडचे राजास वगैरे जागा जागा देवघेव असेल तेथें व हवेली दुकानें असतील त्याजवरी जोरा पोहचावून यांचे रुपये वसुलात येत तें करणें. वे॥ मूर्तींचें अवश्यक जाणून यांचे रुपयांची पैरवी वसुलाची काढोन देणें. जाणिजे छ २३ र॥खर. आज्ञाप्रमाण.
लेखन सीमा.