[८३] ।। श्रीदत्तात्रय ।। २६ सप्टेंबर १७५७.
पे।। छ ११ मोहरम सोमवार दीड प्रहर दिवस सायंकालचा.
अर्ज विज्ञापना ऐसीजे. येथील क्षेम ता। छ ११ मोहरम सोमवार चार घटका दिवस प्रथम मुकाम शहर सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. प्रार्थना ऐशीजे आज्ञापत्र छ १० रविवार चार घटका रात्रचें पाठविलें तें येच समयीं पावलें. सत्वर हुजूर हकीमम॥अल्लीखा यास घेऊन येणें. तुझ्या येण्यास फार गुणक? जातात ह्मणोन विस्तारें आज्ञा. ऐसीयास आज हकीमजीस बाहेर डे-यादाखल करवितों. उदईक सहित खानम।।रनिले सेवसी येतों. निजामअल्ली जाफराबादेच्या पलीकडे साता कोसांवर आहे. त्याचे भले माणुस दोघे येथें आले. जवाबसाल तेहि भले माणुस सहीत याचे सुफीबेगखा व जवाहरमल व ब्रीजनाथ हे तिघेजण जातात. नवाब बाहेर निघतात. जसवंताच्या तलावावर शहरच्या पूर्वेस राहतील. श्रीमंत प्रतापवरिष्ठाभिधान राजश्री पंतप्रधानसाहेबाचें आज्ञापत्र या सेवकास सादर जालें तेंहि पावलें. शहानवाजखानाकडे भला माणूस पाठविला. जवाबसाल ठीक करितों. परवाने जागीरीचे शहानवाजखानाचे तयार होतील ते स्वामीपाशीं येतील. परभारे येक काडीचें काम त्याजला ईतला दिल्हें नाहीं व पुढें ईतला देणार नाहीं. नजरहि माकुल माझे मुदे माफीक ठीक करितो. परवाने जागीर स्वामीपासी परगणे नेमस्त होतील. परवानेहि आह्मीच आपल्यापाशीं ह्यणजे सरकारांत ठेऊन घेऊं. निजामअल्लीकडील राजकारणें लाऊन ठेविलींच आहेत. राजश्री आपाजी धोंडाजी यास जाहेर उगेच ब॥ घेतलें. बातन निजामअल्लीचें राजकारण लाविलें. यास्तव आपाजीपंतास ब॥ घेऊन येतों. जाल्या कराराप्रमाणें हकीमजीस घेऊन येतों. आज सोमवारी मुकाम पेडापुरावरच जाला. उत्तम. उदईक मुकामाविसी आज्ञापत्र सादर करावें. येथून विनंतिपत्र अर्ज होईल त्याप्रमाणें करावयास स्वामी सर्मथ. नवाब बसालतजंग जीवंत आहे. तर जालें राजकारण कारभार तिळभर यांत तफावत नाहीं. निजामअल्ली याजला कुराण देऊन येईल आणि दगा करील तरी न कळे. जालें तरी नफा आणखी होईल. खुलासा हकीमजीस घेऊन सेवेसी पोहचलो जाणावें. सर्व मजकूर रूबरू अर्ज करीन. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.