[४१] ।। श्री ।। १८ अक्टोबर १७५४
राजमान्य राजश्री बाबूराव महादेव दि॥ गोपाळराव गणेश यांसः-
सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार सु॥ खमसखमसैन मय्या व अल्लफ. तुह्मीं पत्रें दोन पाठविलीं, पावलीं. लिहिलें वृत्त सविस्तर कळलें. सफरदरजंगाचें वर्तमान लिहिलें देंहि कळलें. याजउपरि नवाब सुजातदौला काय विचार आचार करितात? मनसबा डामडौल कसा आहे? हे वरचेवरी सविस्तर लिहून पाठवीत जाणें. जाणिजे. छ. १ मोहरम.
लेखन सीमा