[३६] ।। श्री ।। ४ आगष्ट १७५४
राजमान्य राजश्री बाबूराव महादेव दि॥ गोपाळराव गणेश गोसावी यांसिः-
सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार सु॥ खमसखमसेन मया व अलफ. तुह्मीं पत्र पाठविलें प्र॥ जालें. पे॥ अरले व पे॥ कथीत तालुका विजापूर येथील मामलत राजश्री व्यंकाजी रंगनाथ याजकडे आहे. त्यास महमदकुलीखान प्रयागचा सुभा खळ करितो. त्यास ताकीद सफदरजंगापासून करावयाबद्दल साहित्य पत्रें हुजूरचीं पाठवावीं व कांहीं फौज देऊन याचा उपराळा करावा ह्मणून तुह्मीं विनंतिपत्रीं लिहिलें तें कळलें. अशास, साहित्य पत्रें सफदरजंगास व मानाजी पायगुडे व गोविंद बल्लाळ यांसी उपराळा करावा याबद्दल लिहिलें आहे. तुह्मी नवाबापासोन महमदकुलीखान यासी ताकीद करविणें. मवासाचें पारपत्य करावयाचा उपराळा गोविंद बल्लाळ व मानाजी पायगुडे करतील. महमदकुलीचा उपसर्ग, धनवडसिंगाचा उपसर्ग न करणें ऐसी ताकीद सफरदरजंगापासोन करणें. जाणिजे. छ १४ सवाल.
आज्ञाप्रमाण.
लेखन सीमा