[३०] ।। श्री ।। ९ मार्च १७५४
राजश्री बाबूराव महादेव गोसावी यांसिः-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री जयाजी शिंदे दंडवत. सु॥ अर्बा खमसैन मयावअलफ. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. सविस्तर कळलें. ऐशियास, राजश्री गोपाळराव गणेश येथें येऊन सविस्तर वर्तमान श्रीमंत राजश्री दादास्वामीस८८ निवेदन केलें. तदनुसार तिकडील बंदोबस्त होणें तो थोडक्याच दिवसांत होऊन येईल. तुर्त म॥र्निलेस अंतर्वेदींत सरकार कोळ८९ येथील मामलत सांगोन पाठविले असेत. त्यांणींहि तुह्मास सविस्तर लिहिलें असेल. तुह्मीं कोणे गोष्टीची चिंता न करणें. जाणिजे. छ. १४ जमादिलावल. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
शिक्का
मोर्तब सुद