[३०३] ।। श्री ।। ६ नोव्हेंबर १७६३.
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री कासी नरसी गोसावी यासि:
सेवक सदाशिव चिमणाजी नमस्कार सु।। आर्बा सितैन मया अलफ. खासा आगमन किल्ले करारियासि जालें. तरी तुह्मीं आपले जमावसुद्धां ठाणेयांची बंदोबस्ती राखोन तुह्मीं पहिले सरंजामविषई लिहिलें त्याप्रमाणें घेऊन हुजूर येणें. जाणिजे. छ २९ माहे रविलाखर. बहुत काय लिहिणें. मोर्तबांत ‘लेखन सीमा’ ऐसी अक्षरें आहेत.