[२८७]                             ॥ श्री ॥        १ मार्च १७६०.

ढोले व पारखी कसबे पुणें यांचा होळीचे पोळीचा कजिया आहे. सबब, सरकारचा प्यादा घेऊन पोळी लावावी ह्मणोन परवानगी श्रीमंत राजश्री नानांची. रवानगी राघोपंत गडबोले सुभानजी एसाळ दि॥ बहीरजी नाईक मोरे याजब॥ जाली. छ १३ रजब, इहिदे, फाल्गुन शु।। १५.