[२८०] ॥ श्री ॥ २४ डिसेंबर १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बाळाजी गोविंद स्वामीचे सेवेसीः
पोll जनार्दनराम नि॥नारायणराव बापूजी साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. श्रीमंत राजश्री भाऊसाहेबीं तुह्मांकडून तुमचा ऐवज दिल्लीस आला आहे त्यांपैकी देविले ---------- रुपये
१४८६२ll पथक निll नारायणराव बापूजी.
७२२१ll रोजमोरा अठवडे २.
२००० कापड ख॥बद्दल.
५६४१ शेळके व गावडे यांस देविले ते.
१४८६२ll.
७५६ पागा जानराव ---- ---- ----
२१८५ पागा रंभाजी कदम.
१७८०३ll.
येकूण सतरा हजार आठशें साडेतीन रुपये दिल्लीस भरून पावले. छ १५ जमादिलोवल सु।। इहिदे सितैन. बहुत काय लिहिणें. लोभ कीजे. हे विनंति.