[२७९] ॥ श्री ॥ ३१ डिसेंबर १७६०.
राजश्री बाळाजीपंत बाबा गोसावी यांसिः
छ अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य
स्ने॥ कुसाजी व जानराव पाडगुडे रामराम विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वानंदलेखन करीत गेलें पाहिजे. विशेष. श्रीमंत रात्रश्री मल्हारजी होळकर सुभेदार याणी आह्मास रोजमेरा याची वरात तुह्मावर रुपये ७४७५ सात हजार चारशें पंचाहत्तराची दिली होती. दरमाहे करार करून त्या ऐवजीं रुपये ३४८७॥ तीन हजार चारशे साडे सत्यांशी हस्तें बाळाजी अनंत रानडे-कारकून यांचे मार्फतीनें भरून पावलों. हें कबज लिहून दिलें. सही बि॥ कारकून. मिती मार्गशीर्ष वद्य दशमी. शके १६८२ विक्रमनाम संवत्सरे, छ २२ जमादिलावल सु॥ इहिदे सितैन मया अलफ. बहुत काय लिहिणें. लोभ कीजे. हे विनंति. मे।। दिली.