[२७५] ॥ श्री ॥ १२ जानेवारी १७६१.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बाळाजीपंत स्वामी गोसावी यांसि:
पोष्य धोंडो पद्माजी दिमत राजश्री सटवाजी जाधवराव दंडवत विनंति. स्वामीवरी वरात श्रीमंत राजश्री भाऊसाहेब याणीं दिली ---------------------रुपये.
०८०० कित्ता.
०२०० कित्ता.
१०००.
येकूण हजार रुपये देविले ते सदर्हु वराताप्रमाणें हजार रुपये आह्मी भरून पावलों. मु॥ दिल्ली. छ ५ जमादिलाखर सु॥ इहिदे सितैन मया अलफ. हे विनंति.