[२७३] ॥ श्रीशंकर ॥ ९ जानेवारी १७६१.
राजश्री बाळाजीपंतबाबा दाजी गोसावी यांसः
छ खंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य
स्ने॥ कुसाजी पायगुडे दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लेखन केलें पाहिजे. विशेष. श्रीमंत राजश्री सुभेदार याणीं आह्मांस तुह्यावर दरमाहेची नेमणूक करून दिली. त्यापैकीं रुपये २००० दोन हजार भरून पावलों. हस्तें बाळाजी अनंत. सदरहु रुपये भरून पावलों. मिती शके १६८२ विक्रमनाम संवत्सरे पौष सुध ४ मंदवार छ २ माहे जमादिलावल सु॥ इहिदे सितैन मया अलफ. हे कबज लिहून दिले. सही. बहुत काय लिहिणें. लोभ कीजे. हे विनंति.