[२६२]                                      ।। श्री ।।            ३ नोव्हेंबर १७६०.

श्रीमंत राजश्री पंत स्वामीचे सेवेसीः

विनंति सेवक करद्वय जोडून साष्टांग नमस्कार विनंति विज्ञापना. स्वामीची आज्ञा घेऊन जसवंतनगरापाशीं आलों तों राजश्री लक्ष्मणपंत यांजकडून लश्करचे वर्तमानाचें पत्र आलें. तेंच बजिन्नस सेवेसी पाठविलें आहे. त्याजवरून विदित होईल. म-हाटी फौज शेर३१९ झाली. याउपरि अबदालीचें पारपत्य सत्वरच होईलसे दिसतें. मी आज रातोरात सकुराबादेस आज्ञेप्रमाणें जातो. तेथून सविस्तर वर्तमान सेवेसी लिहीन. कृपा करावी. हे विज्ञापना. पे।। मित्ती कार्तीक सुध ७३२० शनवार मु।। इटावे.